संत कबीर · सद्गुरू आणि शब्द
कृपेने भेटलेले गुरू
ग्यान प्रकास्या गुर मिल्या, सो जिनि बीसरि जाइ। जब गोबिंद कृपा करी, तब गुर मिलिया आइ॥
गुरू भेटले आणि ज्ञानाचा प्रकाश पडला; अशा गुरूंना कधीही विसरू नका. आणि गुरू भेटले तरी केव्हा? गोविंदाने कृपा केली, तेव्हाच ते येऊन भेटले. या भेटीचे श्रेय इथे कबीर देवाला देतात. गुरू म्हणजे देवानेच दिलेली देणगी. गुरूंना कधीही न विसरण्याचे हे आणखी एक कारण आहे.