मनाचे श्लोक
अहिल्येचा उद्धार
अहिल्या शिळा राघवें मुक्त केली । पदीं लागतां दिव्य होऊनि गेली । जया वर्णितां शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
शिळा होऊन पडलेल्या अहिल्येला राघवाने मुक्त केले: त्याच्या पायाचा स्पर्श होताच ती दिव्य होऊन उठली. त्याचे वर्णन करता करता वेदांची वाणीही शिणून गेली. राम दासांचा अभिमानी आहे; तो त्यांना कधीच टाकून देत नाही. सुप्रसिद्ध कथेप्रमाणे, गौतम ऋषींच्या शापाने त्यांची पत्नी अहिल्या शिळा झाली होती. रामाच्या पायाच्या स्पर्शाने ती पुन्हा जिवंत झाली.