मनाचे श्लोक
मोठे मोठेही गेले
जिवा कर्मयोगें जनीं जन्म जाला । परी सेवटीं काळमूखीं निमाला । महां थोर ते मृत्युपंथेचि गेले । कितीयेक ते जन्मले आणि मेले ॥
कर्माच्या योगाने जीव जगात जन्माला येतो, आणि शेवटी काळ त्याला गिळून टाकतो. मोठे मोठे, बलाढ्य लोकही मृत्यूच्याच वाटेने गेले. कितीतरी जन्मले, आणि कितीतरी मेले! कर्माचा नियम असा: जीवाने मागच्या जन्मांत जे केले, त्यानुसार त्याला हा जन्म मिळतो. तो जन्म कितीही मोठा असो, त्याचा शेवट सारखाच होतो.