आभाळ आले आणि गेलें । तरी गगन तें संचलें ।
तैसें गुणा नाहीं आलें । निर्गुण ब्रह्म ॥ ३९ ॥
निर्गुण ब्रह्म सगुण झाले का, या शंकेचे उत्तर समर्थ येथे देतात. निर्गुण म्हणजे रूप आणि गुण नसलेले. आकाशात नसलेले ढग अचानक उमटतात, तसे मायेच्या योगाने हे जग झाले. ढगांमुळे आकाशाची निश्चळता गेली असे वाटते, पण ते जसेच्या तसे असते.
समर्थ म्हणतात, ढग आले आणि गेले, तरी आकाश सर्वत्र भरून तसेच राहिले. तसेच निर्गुण ब्रह्म कधी गुणांत आलेच नाही.