निवडक दासबोध ओव्या · Brahman, Maya and the Self
अंतरनिष्ठ तितुके तरले · दासबोध १८.१.२४
अंतरनिष्ठ तितुके तरले । अंतरभ्रष्ट तितुके बुडाले । बाह्यात्कारें भरंगळले । लोकाचारें ॥ २४ ॥
जितके अंतरनिष्ठ, म्हणजे अंतरात्म्याशी निष्ठा ठेवणारे होते, तितके भवसागर तरले. जितके अंतरातून भ्रष्ट झाले, तितके बुडाले; ते बाह्य दिखाव्यात आणि लोकाचारात भरकटून गेले. हा समास अनेक देवस्थानांचा आहे. कीर्ती आणि अपकीर्ती, निंदा आणि स्तुती, या सर्वांचा भोग शेवटी अंतरात्म्यालाच घडतो, असे समर्थ आधी सांगतात. पण लोक अभिमानाने भुलले, देहाकडेच पाहत राहिले, आणि अंतरात असूनही अंतरात्म्याला चुकले. अगाध पुण्याने एखाद्याचेच त्याच्याकडे अनुसंधान राहते.