निवडक दासबोध ओव्या · Brahman, Maya and the Self
देह देउळ आत्मा देव · दासबोध १४.८.२९
देह देउळ आत्मा देव । कोठें धरूं पाहातां भाव । देव वोळखोन जीव । तेथेंचि लावावा ॥ २९ ॥
अखंड ध्यानाच्या या समासात समर्थ विचारतात: ध्यान देवाचे करावे, की देवळाचे? मूर्तीचे ध्यान धरू पाहणारे ते धरता येत नाही म्हणून उगाच कष्टतात, असेही ते सांगतात. या ओवीत समर्थ याचे उत्तर देतात. देह हे देऊळ आहे, आणि आत्मा, म्हणजे आपले खरे स्वरूप, हा त्यातला देव. मग भाव धरायला आणखी कुठे पाहायचे? त्या देवाला ओळखून आपला जीव तिथेच लावावा. याच समासात आधी समर्थ आत्म्याचे वर्णन करतात: तो अंतरसाक्षी द्रष्टा आहे, सर्व काही पाहणारा आणि देहातील इंद्रियांना चालवणारा.