मी कोण ऐसें नेणिजे । तया नांव अज्ञान बोलिजे ।
अज्ञान गेलिया पाविजे । परब्रह्म तें ॥ २२॥
मी कोण आहे, हे न जाणणे, यालाच समर्थ अज्ञान म्हणतात. ते अज्ञान गेले, की परब्रह्म प्राप्त होते. परब्रह्म म्हणजे सर्वांच्या पलीकडचे एकमेव सत्य.
हे अज्ञान कोठून येते, ते थोडे आधी ते दाखवतात. आपण म्हणजे मीपण; मीपण म्हणजे जीवपण, वेगळा जीव असणे; आणि जीवपण म्हणजेच अज्ञान. त्यातूनच आसक्ती जडते.