निवडक दासबोध ओव्या · Devotion
आहे तितुकें देवाचें · दासबोध ११.३.२८
आहे तितुकें देवाचें । ऐसें वर्तणें निश्चयाचें । मूळ तुटें उद्वेगाचें । येणें रीतीं ॥ २८ ॥
सदैव, म्हणजे भाग्यवान माणूस एक क्षणही रिकामा जाऊ देत नाही. आधी काही मिळवतो, मग जेवतो. अडलेल्यांना सोडवतो. असा सर्व बाबतींत सावध असलेल्याला खेद कुठला, असे समर्थ विचारतात. जे जे आहे, ते सारे देवाचे आहे, या निश्चयाने वागावे. या रीतीने उद्वेगाचे, म्हणजे मनाला लागणाऱ्या घोराचे मूळच तुटते, असे समर्थ सांगतात.