निवडक दासबोध ओव्या · Devotion
आयुष्य हेचि रत्नपेटी · दासबोध ३.१०.२७
आयुष्य हेचि रत्नपेटी । माजीं भजनरत्नें गोमटीं । ईश्वरीं अर्पूनिया लुटी । आनंदाची करावी ॥ २७॥
वैराग्याच्या या समासात समर्थ भगवंताच्या भक्तांना धन्य म्हणतात. ते स्वतः तरले, इतरांच्याही उपयोगी पडले, आणि अनंत जन्मांचे पुण्य त्यांच्या रूपाने फळाला आले, असे ते आधीच्या ओव्यांत सांगतात. आयुष्य हीच एक रत्नांची पेटी आहे. तिच्यात भजनाची सुंदर रत्ने आहेत. ती ईश्वराला अर्पण करावीत, आणि आनंदाची लूट करावी, म्हणजे आनंद भरभरून मिळवावा, असे समर्थ सांगतात.