निवडक दासबोध ओव्या · Devotion
चालतां बोलतां धंदा करितां · दासबोध ४.३.७
चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७॥
नवविधा भक्तीतली तिसरी भक्ती म्हणजे स्मरण, देवाचे नाम सतत आठवणे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, सुखात, दुःखात, कोणत्याही अवस्थेत नामस्मरणाशिवाय राहू नये, असे समर्थ या समासात सांगतात. चालताना, बोलताना, कामधंदा करताना, खाताना, जेवताना, सुखी असताना, नाना उपभोग घेताना नाम विसरू नये. पुढे समर्थ सांगतात, संपत्ती असो की विपत्ती, काळाची गती कशीही पडो, नामस्मरणाची स्थिती सोडूच नये.