निवडक दासबोध ओव्या · The Guru and the Seeker
अवगुणाचा करूनि त्याग · दासबोध ५.९.२
अवगुणाचा करूनि त्याग । जेणें धरिला संतसंग । तयासि बोलिजे मग । साधक ऐसा ॥२॥
समर्थ परमार्थाच्या वाटेवरील माणसाच्या पायऱ्या सांगतात: संसारात पूर्ण गुंतलेला बद्ध, मुक्तीची इच्छा धरणारा मुमुक्षु, आणि साधना करणारा साधक. मुमुक्षूचे लक्षण मागच्या समासात सांगून, या समासात ते साधक कसा असतो ते सांगतात. समर्थ म्हणतात, ज्याने आपल्या अवगुणांचा त्याग केला, आणि संतांची संगत धरली, त्याला मग साधक म्हणतात. पुढच्या ओव्यांत ते साधकाचे आणखी रूप सांगतात. तो संतांना शरण जातो, आत्मज्ञान मिळाल्यावर ते दृढ करण्यासाठी साधना करतो, श्रवणाची आवड धरतो, आणि मननाने त्याचा अर्थ काढतो.