जैसा जैसा घडे संग । तैसे गुह्यराचे रंग ।
याकारणें उत्तम मार्ग । पाहोन धरावा ॥ १७ ॥
प्रत्ययाच्या या समासात समर्थ मनाचा एक स्वभाव दाखवतात. विषय उच्च असेल तर अंतरात्मा उंच चढत जातो, आणि विषय खाली उतरला तर तोही खाली उतरतो. उत्तम अन्नाचे वर्णन ऐकले तर मन अन्नाकार होते; स्त्रीच्या सौंदर्याचे वर्णन ऐकले तर मन तिथेच बसते.
म्हणून समर्थ म्हणतात, जशी जशी संगत घडते, तसे तसे अंतःकरणाला रंग चढतात. याकरिता उत्तम मार्ग पारखून धरावा.