निवडक दासबोध ओव्या · The Guru and the Seeker
जो जाणेल भगवंत · दासबोध ६.१.१६-१७
जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे संत । जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ॥ १६॥ चळेना ढळेना देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव । तोचि जाणिजे महानुभाव । तोचि साधू ॥ १७॥
देवाच्या शोधाच्या या समासात समर्थ विचारतात, ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो, पण ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांनाही निर्माण करणारा कोण? तो देव ओळखावा, न कळेल तर सत्संग धरावा, असे ते सांगतात. मग संत कोणाला म्हणावे, ते समर्थ सांगतात. जो भगवंताला जाणतो, त्याला संत म्हणतात. जो शाश्वत काय आणि अशाश्वत काय, याचा निवाडा करतो, तो संत. देव चळत नाही, ढळत नाही, असे ज्याच्या अंतरात पक्के ठसलेले आहे, तोच महानुभाव, तोच साधू.