निवडक दासबोध ओव्या · The Guru and the Seeker
सद्गुरुविण ज्ञान कांहीं · दासबोध ५.१.२१-२२
सद्गुरुविण ज्ञान कांहीं । सर्वथा होणार नाहीं । अज्ञान प्राणी प्रवाहीं । वाहातचि गेले ॥ २१॥ ज्ञानविरहित जें जें केलें । तें तें जन्मासि मूळ जालें । म्हणौनि सद्गुरूचीं पाऊलें । सुदृढ धरावीं ॥ २२॥
गुरुनिश्चयाच्या या समासात समर्थ सद्गुरूची, म्हणजे आत्मज्ञान देणाऱ्या खऱ्या गुरूची, आवश्यकता सांगतात. स्वधर्माने वागणारा ब्राह्मण पूज्य खरा, पण सद्गुरूविना ब्रह्मज्ञान होत नाही, असे ते आधीच्या ओवीत म्हणतात. समर्थ म्हणतात, सद्गुरूशिवाय ज्ञान मुळीच होणार नाही. अज्ञानी प्राणी संसाराच्या प्रवाहात वाहतच गेले. ज्ञानाविना जे जे केले, ते ते पुन्हा जन्माला मूळ झाले. म्हणून सद्गुरूची पावले घट्ट धरावीत.