निवडक दासबोध ओव्या · The Guru and the Seeker
श्रवण मनन निजध्यास · दासबोध १०.९.३०
श्रवण मनन निजध्यास । प्रचितीनें बाणतां विश्वास । रोकड साक्षात्कार सायास । करणेंचि नलगे ॥ ३० ॥
या समासात समर्थ सांगतात, सद्गुरूविना ज्ञान होणे अघटित आहे, आणि विचार न करता केलेले सगळे वाया जाते. खऱ्या साधकाला निरूपणानेच साक्षात्कार होतो, असेही ते याच्या आधी म्हणतात. श्रवण म्हणजे अध्यात्म ऐकणे, मनन म्हणजे त्याचा विचार करणे, आणि निदिध्यास म्हणजे त्यातच चित्त सतत लावून ठेवणे. समर्थ म्हणतात, या तिन्हींनी प्रचीतीसह विश्वास अंतरात बाणला, की साक्षात्कार रोकडा, प्रत्यक्ष होतो. त्यासाठी मग वेगळे कष्ट करावेच लागत नाहीत.