निवडक दासबोध ओव्या · The Guru and the Seeker
येथें प्रचित हें प्रमाण · दासबोध ९.५.१४-१५
येथें प्रचित हें प्रमाण । नलगे शास्त्राचा अनुमान । अथवा शास्त्रीं तरी पाहोन । प्रत्ययो आणावा ॥ १४ ॥ प्रचितीवीण जें बोलणें । तें अवघेंचि कंटाळवाणें । तोंड पसरून जैसें सुणें । रडोन गेलें ॥ १५ ॥
या समासात एक श्रोता समर्थांना शास्त्रातील तर्क विचारतो. देहात अहंकार, तसा विश्वात रुद्र, असे शास्त्र सांगते; मग विष्णूचे अंतःकरण कोणते, चंद्राचे मन कसे, ब्रह्मदेवाची बुद्धी कशी, हे निश्चित सांगा, असे तो म्हणतो. समर्थ उत्तर देतात, येथे प्रचीती, म्हणजे स्वतःचा अनुभव, हेच प्रमाण. शास्त्रातील अनुमानाची गरज नाही. किंवा शास्त्रात पाहिले, तरी त्याचा प्रत्यय आणून पाहावा. प्रचीतीविना जे बोलणे, ते सगळे कंटाळवाणे. जसे कुत्रे तोंड पसरून रडून निघून जाते, तसे ते.