निवडक दासबोध ओव्या · The Mahant: Leading People
आपण येथेष्ट जेवणें · दासबोध १२.१०.१-३
आपण येथेष्ट जेवणें । उरलें तें अन्न वाटणें । परंतु वाया दवडणें । हा धर्म नव्हे ॥ १ ॥ तैसें ज्ञानें तृप्त व्हावें। तेंचि ज्ञान जनास सांगावें । तरतेन बुडों नेदावें । बुडतयासी ॥ २ ॥ उत्तम गुण स्वयें घ्यावे । ते बहुतांस सांगावे । वर्तल्याविण बोलावे । ते शब्द मिथ्या ॥ ३ ॥
उत्तम पुरुषाची लक्षणे सांगणारा हा समास याच ओव्यांनी सुरू होतो. आपण पोटभर जेवावे, आणि उरलेले अन्न वाटावे. पण ते वाया घालवणे हा धर्म नव्हे. तसेच ज्ञानाने आपण तृप्त व्हावे, आणि तेच ज्ञान लोकांना सांगावे. ज्याला पोहता येते, त्याने बुडणाऱ्याला बुडू देऊ नये. उत्तम गुण आपण स्वतः घ्यावेत, आणि ते अनेकांना सांगावेत. पण स्वतः तसे न वागता बोलले, तर ते शब्द मिथ्या, म्हणजे पोकळ ठरतात, असे समर्थ सांगतात.