निवडक दासबोध ओव्या · The Mahant: Leading People
मुख्य हरिकथा निरूपण · दासबोध ११.५.४-५
मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकरण । तिसरें तें सावधपण । सर्वविषईं ॥ ४ ॥ चौथा अत्यंत साक्षप । फेडावे नाना आक्षप । अन्याये थोर अथवा अल्प । क्ष्मा करीत जावे ॥ ५ ॥
या समासात समर्थ भक्तांचा समुदाय उभा करणाऱ्या आणि सांभाळणाऱ्या नेत्याची कामे सांगतात. अशा नेत्याला ते अन्यत्र महंत म्हणतात. आपला समुदाय अनन्य राहावा आणि इतर लोकांतही भाव उपजावा, हा त्याचा हेतू. समर्थ सांगतात, पहिली आणि मुख्य गोष्ट म्हणजे हरिकथा निरूपण, म्हणजे देवाच्या कथा सांगून त्यांचा अर्थ उलगडणे. दुसरी गोष्ट राजकारण, म्हणजे माणसे आणि व्यवहार कुशलतेने हाताळण्याची कला; दुसऱ्याचे मन जाणणे, नीतिन्याय राखणे, एकेकाला बोध करणे, असे त्याचे रूप पुढच्या ओव्यांत दिसते. तिसरी, सर्व बाबतींत सावधपणा. चौथी, अत्यंत उद्योगीपणा. लोकांचे नाना आक्षेप दूर करावेत. आणि अन्याय मोठा असो की लहान, त्याची क्षमा करीत जावे.