निवडक दासबोध ओव्या · The Mahant: Leading People
उत्कट भव्य तेंचि घ्यावें · दासबोध १९.६.१५
उत्कट भव्य तेंचि घ्यावें । मळमळीत अवघेंचि टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥ १५ ॥
जे उत्कट आणि भव्य आहे, तेच घ्यावे. जे मिळमिळीत आहे, ते सगळे टाकून द्यावे. आणि निस्पृहपणाने, स्वतःसाठी काहीच न इच्छिता, पृथ्वीवर विख्यात व्हावे. समुदाय उभा करणाऱ्याला समर्थ येथे शिकवण देतात. आधीच्या ओवीत ते म्हणतात, ब्राह्मणमंडळ्या जमवाव्यात, भक्तमंडळ्यांना मान द्यावा, आणि पृथ्वीवर संतमंडळ्या शोधाव्यात. पुढच्या ओव्यांत उत्कट म्हणजे काय, ते दिसते. अक्षर चांगले, वाचणे चांगले, अर्थ उलगडून सांगणे चांगले. गाणे, नाचणे, पाठांतर सगळेच चांगले. दीक्षा चांगली, मैत्री चांगली, आणि राजकारणातली तीक्ष्ण बुद्धी चांगली. आणि तो नाना प्रकारांनी स्वतःला अलिप्त राखतो.