निवडक दासबोध ओव्या · This Book and This Life
जेणें परमार्थ वोळखिला · दासबोध १.९.२५
जेणें परमार्थ वोळखिला । तेणें जन्म सार्थक केला । येर तो पापी जन्मला । कुलक्षयाकारणें ॥ २५॥
परमार्थ म्हणजे देवाचा आणि आत्म्याचा शोध; हाच जन्माचे सार्थक करतो. अनंत जन्मांचे पुण्य जमले, तेव्हाच तो घडतो, असे समर्थ परमार्थाच्या स्तवनात सांगतात. ज्याने परमार्थ ओळखला, त्याने आपला जन्म सार्थक केला. बाकीचा तो पापी, केवळ आपल्या कुळाचा नाश करण्यासाठी जन्मला, असे समर्थ म्हणतात. पुढच्या ओव्यांत ते सांगतात, भल्या माणसाने परमार्थात भरून जावे, आपले शरीर सार्थकी लावावे, आणि हरिभक्ती करून आपल्या पूर्वजांचाही उद्धार करावा.