निवडक दासबोध ओव्या · This Book and This Life
कित्तेक भूमी माझी म्हणती · दासबोध १६.३.२९
कित्तेक भूमी माझी म्हणती । सेवटीं आपणचि मरोन जाती । कित्तेक काळ होतां जगती । जैसी तैसी ॥ २९ ॥
सारे जीवन पृथ्वीच्या आधारावर चालते. मोठमोठे बलवान होऊन गेले, पृथ्वीवर चौखूर उधळले, पण तिच्यापासून कोणीच वेगळा राहू शकला नाही. पृथ्वीच्या स्तवनात समर्थ असे सांगतात. समर्थ म्हणतात, कितीतरी लोक ‘ही भूमी माझी’ म्हणतात. पण शेवटी तेच मरून जातात. कितीतरी काळ लोटला, तरी ही धरती जशी होती तशीच राहते. पुढच्या ओवीत ते म्हणतात, असा पृथ्वीचा महिमा आहे; तिला दुसरी उपमा कोणती द्यावी? ब्रह्मदेवापासून आपल्यापर्यंत सर्वांना तिचाच आश्रय आहे.