मतामतांचा गल्बला । कोणी पुसेना कोणाला ।
जो जे मतीं सांपडला । तयास तेंचि थोर ॥ २५ ॥
असत्याचा अभिमान । तेणें पाविजे पतन ।
म्हणोनियां ज्ञाते जन । सत्य शोधिती ॥ २६ ॥
देव उदंड झाले, शास्त्रांचा बाजार भरला, आणि लोक आपल्या कामना पुऱ्या करणाऱ्या व्रतांना झोंबू लागले. सत्य आणि असत्य यांचा भेदच हरवला. असे समर्थ आपल्या काळातल्या धर्माच्या गोंधळाचे चित्र रेखाटतात.
मतामतांचा नुसता गलबला झाला आहे. कोणी कोणाला विचारत नाही. जो ज्या मतात सापडला, त्याला तेच थोर वाटते.
असत्याचा अभिमान धरला, तर त्याने पतनच होते. म्हणून जाणते लोक सत्याचा शोध घेतात, असे समर्थ म्हणतात.