आधीं राखावा आचार । मग पाहावा विचार।
आचारविचारें पैलपार । पाविजेतो ॥ २५॥
आधी आचार, म्हणजे शुद्ध आणि नेमके वर्तन, राखावा. मग विचार पाहावा. आचार आणि विचार, या दोहोंनीच पैलतीर गाठता येतो.
हा समास टोणप्या सिद्धांचा आहे: सिद्ध, म्हणजे साक्षात्कारी, असल्याचा आव आणणारे ढोंगी मूर्ख. त्यांना खरे आणि खोटे एकच वाटते. जो आपल्या गलिच्छपणामुळे शौचानंतर साधी स्वच्छताही जाणत नाही, त्याला वेद, शास्त्रे आणि पुराणे काय करणार, असे समर्थ आधीच्या ओवीत विचारतात.