निवडक दासबोध ओव्या · Worldly Life Done Well
कष्टेंविण फळ नाहीं · दासबोध १८.७.३-५
कष्टेंविण फळ नाहीं । कष्टेंविण राज्य नाहीं । केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं ॥ ३ ॥ आळसें काम नासतें । हें तों प्रत्ययास येतें । कष्टाकडे चुकावितें । हीन जन ॥ ४ ॥ आधीं कष्टाचें दुःख सोसिति । ते पुढें सुखाचें फळ भोगिती । आधीं आळसें सुखावती । त्यासी पुढें दुःख ॥ ५ ॥
कष्टाशिवाय फळ नाही, कष्टाशिवाय राज्य नाही. जगात काही केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही. आळसाने काम नासते, हे तर प्रत्यक्ष अनुभवाला येते. तरी हीन लोक कष्टाला चुकवतात. जे आधी कष्टाचे दुःख सोसतात, ते पुढे सुखाचे फळ भोगतात. आणि जे आधी आळसात सुखावतात, त्यांच्या वाट्याला पुढे दुःख येते. लोकांच्या स्वभावाविषयीच्या या समासाची सुरुवात समर्थ लोभी स्वभावापासून करतात. लोक काहीच भक्ती न करता देवाची प्रसन्नता इच्छितात, जसे एखादा काहीच सेवा न करता धन्याकडे मागणी करतो. त्यावर समर्थांचे हे उत्तर आहे.