निवडक दासबोध ओव्या · Worldly Life Done Well
प्रपंच सुखें करावा · दासबोध ५.३.१०३
प्रपंच सुखें करावा । परी कांहीं परमार्थ वाढवावा । परमार्थ अवघाचि बुडवावा । हें विहित नव्हे ॥ १०३॥
प्रपंच सुखाने करावा. पण त्याबरोबर थोडा तरी परमार्थ वाढवावा. परमार्थ पूर्णच बुडवणे हे विहित नाही, योग्य नाही. शिष्याच्या लक्षणांच्या या समासात समर्थ आधी संसारावर कठोर बोलतात. संसाराच्या संगतीने कोणाला सुख मिळाले, असे कधी पाहिले नाही, की ऐकले नाही. जे संसारातच सुख मानतात, ते मूढ; आणि जे हे जाणूनही डोळे झाकतात, ते पढतमूर्ख. तरी ते शिष्याला प्रपंच सोडायला सांगत नाहीत; परमार्थ हरवू देऊ नको, एवढेच सांगतात.