तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ३३९६: आह्मां घरीं धन शब्दाचीं च रत्ने
आह्मां घरीं धन शब्दाचीं च रत्ने । शब्दाची च शस्त्रे यत्न करूं ॥१॥ शब्द चि आमुच्या जीवाचे जीवन । शब्दे वांटूं धन जनलोकां ॥२॥ तुका ह्मणे पाहा शब्द चि हा देव । शब्दे चि गौरव पूजा करूं ॥३॥
आमच्या घरी धन म्हणजे शब्दांचीच रत्ने. शब्दांचीच शस्त्रे घेऊन आम्ही प्रयत्न करू. शब्द हेच आमच्या जिवाचे जीवन; शब्दांनीच आम्ही लोकांना धन वाटू. तुकाराम महाराज म्हणतात, पाहा, शब्द हाच देव आहे. शब्दांनीच आम्ही त्याचा गौरव करू, त्याची पूजा करू.