“लिहायला शिकणारा मुलगा आधी मोठी मोठी, वेडीवाकडी अक्षरे काढतो; मग त्याला बारीक अक्षर जमते. तसेच आपण आधी मन रूपांवर स्थिर करून एकाग्रता शिकली पाहिजे. ते जमले की मग निराकारावरही मन सहज स्थिर करता येते.”
येथे रूप म्हणजे साकार देव: एखादी मूर्ती, किंवा मनाला धरून ठेवता येईल असे देवाचे एखादे रूप.