श्रीरामकृष्ण परमहंस · एक ईश्वर, अनेक नावे
आकाशासारखी निळी काली
“कालीमाता खरोखरच गडद निळ्या आहेत का? छे! त्या आपल्या जाणिवेच्या इतक्या पलीकडे आहेत, की फक्त तशा दिसतात. दुरून आकाश निळे दिसत नाही का? आपल्याजवळच्या आकाशाला काही रंग नसतो. समुद्राच्या पाण्याचेही तसेच. दुरून ते गडद निळे दिसते. जवळ जाऊन थोडे ओंजळीत घ्या, म्हणजे त्याला काही रंग नाही हे कळेल. तसेच जवळ जा, जगन्माता कालीचा साक्षात्कार करून घ्या; मग दिसेल की ज्याच्याविषयी काहीच सांगता येत नाही, त्या ब्रह्मरूप परमेश्वराशी कालीमाता एकरूप आहेत.”
दक्षिणेश्वरला श्रीरामकृष्ण ज्यांचे पुजारी होते, त्या कालीमातेची कांती मूर्तींत आणि चित्रांत गडद निळी किंवा काळी दाखवतात. ते हा शब्द वापरत त्या अर्थाने साक्षात्कार म्हणजे स्वतःच्या अनुभवाने जाणणे. ब्रह्म सर्व गुणांच्या पलीकडे आहे.