श्रीरामकृष्ण परमहंस · एक ईश्वर, अनेक नावे
खडीसाखरेची वडी
“देव साकार आहे असे तुम्ही माना, की निराकार आहे असे माना; तळमळीने, व्याकुळ मनाने तुम्ही परमेश्वराचा धावा केला पाहिजे. परमेश्वर अंतर्यामी राहून जीवाला चालवतो. तुमची हाक हृदयाच्या तळापासून त्याच्यापर्यंत गेली, तर तो तुमची प्रार्थना पुरी करेल; मग तो साकार आहे असे तुम्ही माना किंवा मानू नका. खडीसाखरेची वडी तोंडात घालताना सरळ धरा की वाकडी धरा, ती तितकीच गोड लागते.”
हे ऐकून श्रोते हसले. देव साकार आहे, देवळांतल्या मूर्तींसारखा, की ब्राह्मसमाज शिकवत असे तसा निराकार, हा विषय श्रीरामकृष्णांच्या बोलण्यात नेहमी निघत असे.