श्रीरामकृष्ण परमहंस · एक ईश्वर, अनेक नावे
ओंडका आणि बोरू
“एखादा मोठा ओंडका प्रवाहातून वाहत जातो, तेव्हा तो शेकडो जणांना वाहून नेतो, तरी बुडत नाही. पण वाहत जाणारे बोरूचे कांडे एखाद्या कावळ्याच्या वजनानेही बुडू शकते. तसेच तारणहार जन्माला येतो, तेव्हा असंख्य माणसे त्याचा आश्रय घेऊन मुक्त होतात. सिद्ध मात्र फक्त स्वतःलाच तारतो, आणि तेही मोठ्या कष्टाने, खस्ता खाऊन.”
सिद्ध म्हणजे स्वतःच्या साधनेने देवापर्यंत पोहोचलेला, पूर्णत्वाला गेलेला माणूस. येथे तारणहार म्हणजे अवतार, माणसाच्या रूपात जन्मलेला देव.