श्रीरामकृष्ण परमहंस · एक ईश्वर, अनेक नावे
राजाचा व्हाइसरॉय
“अवतार, तारणहार, हा देवाचा दूत असतो. तो एखाद्या बलाढ्य राजाच्या व्हाइसरॉयसारखा असतो. दूरच्या एखाद्या प्रांतात अशांतता माजली, की ती मोडून काढायला राजा आपल्या व्हाइसरॉयला पाठवतो. तसेच जगाच्या कोणत्याही भागात धर्माला ग्लानी आली, की देव तिथे आपला अवतार पाठवतो.”
अवतार म्हणजे माणसाच्या रूपात जन्मलेला देव (शब्दाचा अर्थ “खाली उतरणे”); राम आणि कृष्ण असे अवतार होते, असे हिंदू मानतात. त्यांच्या काळात भारताचा कारभार व्हाइसरॉय पाहत असे; राणीच्या नावाने राज्य करायला त्याला ब्रिटनहून पाठवले जाई. हा विचार भगवद्गीतेतल्या श्रीकृष्णांचा आहे: “अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, आणि अधर्म डोके वर काढतो, तेव्हा तेव्हा मी स्वतःला प्रकट करतो.” धर्म म्हणजे जगाची योग्य व्यवस्था; अधर्म म्हणजे तिच्या उलट.