“सगळे कोल्हे एकसारखेच ओरडतात. जगातल्या सगळ्या ज्ञानी माणसांची शिकवणही खरे तर एकच आहे.”
त्यांच्या काळी बंगालच्या खेड्यांतून आणि शेतांतून कोल्हे फिरत असत. तिन्हीसांजेची त्यांची कोल्हेकुई हा गावाकडचा अगदी नेहमीचा आवाज होता. एकाने सुरुवात केली की बाकीचे सगळे तोच सूर लावत.