श्रीरामकृष्ण परमहंस · एक ईश्वर, अनेक नावे
स्वतःची दृष्टी धरून ठेवा
“देवाचे साकारापेक्षा निराकार रूपात ध्यान करणे तुम्हाला जास्त आवडते. चांगले आहे. त्याच्याकडे या दृष्टीने पाहिले काय किंवा त्या दृष्टीने पाहिले काय, काही बिघडत नाही. होय, त्याला निराकार मानणे अगदी योग्य आहे. पण हीच दृष्टी खरी आणि बाकी सगळे खोटे, असा ग्रह मात्र करून घेऊ नका. त्याचे साकार रूपात ध्यान करणेही तितकेच योग्य आहे. पण देवाचा साक्षात्कार होईपर्यंत, तो दिसेपर्यंत, तुम्ही तुमची स्वतःची दृष्टी धरून ठेवली पाहिजे. मग सगळे स्पष्ट होईल.”
एका श्रोत्याने म्हटले होते की देवाचे निराकार रूपात ध्यान करणे त्याला जास्त आवडते; त्याला श्रीरामकृष्ण उत्तर देत होते. ते हा शब्द वापरत त्या अर्थाने साक्षात्कार म्हणजे स्वतःच्या अनुभवाने जाणणे.