श्रीरामकृष्ण परमहंस · एक ईश्वर, अनेक नावे
उकळते भांडे
“माणसाचे शरीर म्हणजे चुलीवर उकळणारे भांडे, आणि मन आणि इंद्रिये म्हणजे त्यातले पाणी, तांदूळ, बटाटे वगैरे. सगळ्या जिनसांसह ते भांडे विस्तवावर ठेवा; ते इतके तापते की हात लावला तर बोट भाजते. पण ती उष्णता भांड्याची नसते, आणि त्यातल्या कशाचीही नसते. ती विस्तवाची असते. तसेच माणसातला ब्रह्माचा अग्नी मनाला आणि इंद्रियांना त्यांची त्यांची कामे करायला लावतो. तो अग्नी विझला की इंद्रिये, सगळे अवयवही थांबतात.”
येथे ब्रह्म म्हणजे माणसाच्या आतली ती शक्ती, जिच्यामुळे मन विचार करते आणि इंद्रिये पाहतात, ऐकतात, अनुभवतात.