श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
अंगठ्यावर पाय
गर्दीच्या रस्त्यात
श्रीरामकृष्णांनी ही गोष्ट सांगितली. एकदा एक साधू गर्दीच्या रस्त्यातून जात होता. चुकून त्याचा पाय एका दुष्ट माणसाच्या पायाच्या अंगठ्यावर पडला. तो माणूस संतापाने भडकला. त्याने साधूला इतके निर्दयपणे मारले, की साधू बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. साधूच्या शिष्यांनी फार कष्ट घेतले. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी त्यांनी सगळे उपाय करून पाहिले. साधू थोडा शुद्धीवर आला आहे, असे दिसल्यावर त्यांच्यापैकी एकाने विचारले, “महाराज, तुमची शुश्रूषा कोण करत आहे, ते कळते का तुम्हाला?” साधू म्हणाला, “ज्याने मला मारले, तोच.” “खरा साधू,” श्रीरामकृष्ण म्हणाले, “मित्र आणि शत्रू यांच्यात भेद पाहत नाही.”