श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
हरीशचे लग्न झाले की
वडिलांचा बेत
एक माणूस श्रीरामकृष्णांना म्हणाला, “माझा मुलगा हरीश मोठा झाला की मी त्याचे लग्न लावून देईन, आणि घराची जबाबदारी त्याच्यावर सोपवीन. मग मी संसार सोडीन, आणि योगाभ्यास सुरू करीन.” योग या शब्दाने त्याला भक्तीला वाहिलेले जीवन म्हणायचे होते. श्रीरामकृष्ण त्याला म्हणाले, “तुम्हाला योगाभ्यासाची संधी कधीच मिळणार नाही. नंतर तुम्ही म्हणाल, ‘हरीश आणि गिरीश माझ्यात फार गुंतले आहेत. त्यांना अजून माझा सहवास सोडायचा नाही.’ मग कदाचित तुम्हाला वाटेल, ‘हरीशला मुलगा होऊ दे, आणि त्या मुलाचे लग्न मला पाहू दे.’ आणि असे तुमच्या इच्छांना कधी अंतच येणार नाही.”