श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
मध्यरात्रीचा विस्तव
शेजाऱ्याचे दार
अजून तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे का, असे श्रीरामकृष्णांनी एका वृद्ध शिष्याला विचारले. आणखी थोडे फिरून यावे असे वाटते, असे ते वृद्ध गृहस्थ म्हणाले. “देव बाहेर, निरनिराळ्या ठिकाणी आहे असे वाटते, तोवर अज्ञान असते,” श्रीरामकृष्ण म्हणाले. “पण देव आतच आहे असा साक्षात्कार झाला, की ते खरे ज्ञान.” आणि त्यांनी ही गोष्ट सांगितली. एक माणूस मध्यरात्री जागा झाला. त्याला तंबाखू ओढायची होती. त्यासाठी विस्तव हवा होता, म्हणून तो शेजाऱ्याच्या घरी गेला आणि त्याने दार ठोठावले. कोणीतरी दार उघडले, आणि काय हवे आहे असे त्याला विचारले. तो माणूस म्हणाला, “मला तंबाखू ओढायची आहे. जरा विस्तव मिळेल का?” शेजारी म्हणाला, “अरे, तुला झाले तरी काय? एवढी तसदी घेऊन, या वेळी आम्हाला झोपेतून उठवलेस, आणि तुझ्या हातात तर पेटलेला कंदील आहे!” “माणसाला जे हवे असते, ते त्याच्यापाशीच असते,” श्रीरामकृष्ण म्हणाले. “तरीही ते शोधत तो इकडेतिकडे भटकत राहतो.”