श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
पाण्यावरून चालणे
चौदा वर्षे
श्रीरामकृष्णांनी ही गोष्ट सांगितली. एका माणसाने रानात एकट्याने राहून चौदा वर्षे कठोर तपश्चर्या केली. शेवटी त्याला पाण्यावरून चालण्याची शक्ती मिळाली. आनंदाने हरखून तो आपल्या गुरूकडे गेला, आणि आपला हा मोठा पराक्रम त्याने गुरूला सांगितला. गुरू म्हणाला, “अरे बिचाऱ्या पोरा, चौदा वर्षे कष्ट उपसून तू जे मिळवलेस, ते साधी माणसे नावाड्याला एक पैसा देऊन करतात.”