श्रीरामकृष्ण परमहंस · श्रीरामकृष्णांच्या बोधकथा
रानातला वाघ
दोन वाटसरू
श्रीरामकृष्णांनी ही गोष्ट सांगितली. एकदा एक भक्त आणि एक ज्ञानी रानातून चालले होते. वाटेत त्यांना दूरवर एक वाघ दिसला. ज्ञानी म्हणाला, “आपण पळून जायचे काहीच कारण नाही. सर्वशक्तिमान देव आपले नक्कीच रक्षण करील.” त्यावर भक्त म्हणाला, “नाही रे भाऊ, चल, पळू या. जे आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने करता येते, त्यासाठी भगवंतांना कशाला त्रास द्यायचा?”