श्रीरामकृष्ण परमहंस · भक्ती, ज्ञान आणि कर्म
‘बा’ म्हणणारे बाळ
“एखादा पंडित संस्कृतमध्ये बोलला, तर मला ते समजते, पण मला स्वतःला संस्कृत बोलता येत नाही. देवाचा साक्षात्कार हेच जीवनाचे एकमेव साध्य. देवाचा साक्षात्कार झाला, की मी समाधानी. मला संस्कृत येत नसेल तर काय बिघडले? “देवाला जाणण्याची तळमळ असलेली त्याची लेकरे विद्वान असोत की अडाणी, देव सगळ्यांवर सारखीच कृपा करतो. समजा, एका बापाला काही मुले आहेत. त्यांतली काही त्याला ‘बाबा’ म्हणू शकतात. इतरांना फक्त ‘बा’ किंवा ‘पा’ म्हणता येते; त्यांना पूर्ण शब्द म्हणता येत नाही. म्हणून बाप त्यांच्यावर इतरांपेक्षा कमी प्रेम करील का? ती अजून तान्ही आहेत, त्यांना ‘बाबा’ स्पष्ट म्हणता येत नाही, हे त्याला ठाऊक असते. बाप सगळ्यांवर सारखेच प्रेम करतो.”
संस्कृत ही हिंदू धर्मग्रंथांची प्राचीन भाषा; पंडित ती बोलत-लिहीत. श्रीरामकृष्णांचे शालेय शिक्षण जवळजवळ झालेच नव्हते. त्यांच्या भाषेत देवाचा साक्षात्कार म्हणजे स्वतःच्या अनुभवाने देवाला जाणणे.