“देवाच्या प्रेमीला देवाला आई म्हणण्यात एवढा आनंद का वाटतो? कारण मूल इतर कोणापेक्षाही आईपाशी जास्त मोकळे असते, आणि म्हणून मुलाला ती इतर कोणापेक्षाही जास्त प्रिय असते.”
श्रीरामकृष्ण स्वतः दक्षिणेश्वरच्या कालीमंदिरात पुजारी होते; ते मंदिर कलकत्त्याच्या उत्तरेला गंगेच्या काठी आहे. तिथे ते देवाची आईच्या, कालीमातेच्या रूपात उपासना करत.