“रेल्वेचे इंजिन जड माल भरलेल्या डब्यांची लांबलचक गाडी सहज ओढून नेते. जे देवाची लेकरे होऊन त्याच्यावर प्रेम करतात, श्रद्धेत आणि भक्तीत अढळ असतात, त्यांचेही तसेच असते. ते जीवनातल्या सगळ्या चिंता-काळज्यांतून काहीही त्रास न होता पार जातात, आणि दुसऱ्या पुष्कळांनाही स्वतःबरोबर देवाकडे घेऊन जातात.”