“भक्त देवासाठी सर्वस्व का सोडतो? अंधारातल्या किड्याला उजेड दिसला रे दिसला, की तो अंधारातून उडून बाहेर येतो. आणि मुंगी काकवीत जीव गमावते, पण काकवी सोडत नाही. तसा भक्त आपल्या देवाला कायमचा बिलगून राहतो, आणि बाकी सगळे सोडतो.”
काकवी म्हणजे उसाचा रस आटवून केलेला दाट, काळसर पाक.