श्रीरामकृष्ण परमहंस · भक्ती, ज्ञान आणि कर्म
कढईतून उडणारी साळ
“साळ कढईत भाजली, की काही दाणे कढईतून उडून बाहेर पडतात आणि तिथे फुटतात. हे सर्वांत चांगले भाजलेले असतात: त्यांच्यावर करपल्याचा जराही डाग नसतो. कढईतच राहून नीट भाजलेल्या प्रत्येक दाण्यावर निदान एखादा बारीक करपलेला ठिपका असतोच. तसेच, सगळ्या चांगल्या भक्तांपैकी जे थोडे संसार पूर्णपणे सोडून बाहेर पडतात, ते परिपूर्ण, निष्कलंक असतात. पण संसारात राहणाऱ्या भक्तांपैकी अगदी उत्तम भक्ताच्याही स्वभावात एखादा तरी लहानसा दोष असतोच.”
साळ म्हणजे टरफलासकट भात. गरम कढईत भाजली की तिचे दाणे फुटून लाह्या होतात; बंगालमध्ये लाह्या रोजच्या खाण्यात असत.