श्रीरामकृष्ण परमहंस · भक्ती, ज्ञान आणि कर्म
कळपातल्या गाई
“गाईंच्या कळपात एखादे परके जनावर शिरले, तर सगळा कळप मिळून त्याला हुसकावून लावतो. पण एखादी गाय आली, तर बाकीच्या सगळ्या तिच्याशी मैत्री करतात, आणि एकमेकींना चाटतात. तसे एक भक्त दुसऱ्या भक्ताला भेटला, की दोघांना खूप आनंद होतो, आणि त्यांना एकमेकांपासून दूर जावेसे वाटत नाही. पण त्यांच्यात एखादा टिंगलखोर आला, तर ते त्याच्यापासून कटाक्षाने दूर राहतात.”