श्रीरामकृष्ण परमहंस · भक्ती, ज्ञान आणि कर्म
खडीसाखर आणि काकवी
“कर्म कोणालाच टाळता येत नाही. मनाची प्रत्येक हालचाल कर्मच आहे: ‘मला वाटते’ किंवा ‘मी विचार करतो’ हा विचारसुद्धा कर्मच. कर्माविषयी भक्तिमार्गाचे म्हणणे एवढेच: भक्ती, देवावरचे प्रेम, कर्म सोपे करते. “पहिली गोष्ट, देवावरचे हे प्रेम माणसाचे मन त्याच्या आदर्शावर, देवावर, स्थिर करते, आणि त्यामुळे त्याचे कर्म कमी होते. दुसरी गोष्ट, अनासक्तपणे कर्म करायला ते मदत करते. परमेश्वरावर प्रेम करायचे, आणि त्याच वेळी संपत्ती, सुख, कीर्ती किंवा सत्ता यांच्यावरही प्रेम करायचे, हे जमत नाही. ज्याने एकदा ‘ओला’ खडीसाखरेचे सरबत चाखले, त्याला काकवीचे सरबत आवडत नाही.”
याच्या आधी श्रीरामकृष्ण म्हणाले होते की या युगात कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग यांच्यापेक्षा भक्तिमार्ग अधिक जुळणारा आहे. ‘ओला’ हे एका प्रकारच्या खडीसाखरेचे नाव; उसाचा रस आटवून केलेल्या काळसर पाकापेक्षा, काकवीपेक्षा, ती कितीतरी उंची असते.