श्रीरामकृष्ण परमहंस · भक्ती, ज्ञान आणि कर्म
खडीसाखर ही मिठाई नव्हे
“हेलेंचा पालेभाज्यांत मोजत नाहीत, आणि खडीसाखर साध्या मिठाईत मोजत नाहीत; कारण आजारी माणसाने ही दोन्ही खाल्ली तरी त्याच्या प्रकृतीला अपाय होत नाही. प्रणवाला शब्द मानत नाहीत; तो साक्षात दिव्य तत्त्वच मानतात. तसेच, पावित्र्याची, भक्तीची आणि प्रेमाची इच्छा ही इच्छा म्हणून मोजायचीच नाही.”
हेलेंचा ही बंगालमधली पाण्यात पसरणारी एक वेल; तिची पालेभाजी करतात. प्रणव म्हणजे पवित्र अक्षर ॐ; तो देवाचे नादरूप मानला जातो.