श्रीरामकृष्ण परमहंस · भक्ती, ज्ञान आणि कर्म
लपवलेले आणि पुकारलेले
“माणसे दोन प्रकारची असतात. एका गुरूने आपल्या एका शिष्याला सांगितले, ‘बाळा, मी तुला जे देतो आहे ते अमोल आहे. ते तुझ्यापाशीच ठेव.’ आणि त्या शिष्याने ते सगळे स्वतःपाशीच ठेवले. पण तेच ज्ञान गुरूने दुसऱ्या शिष्याला दिले, तेव्हा ते किती मोलाचे आहे हे या शिष्याने ओळखले. एकट्यानेच त्याचा आनंद घेणे त्याला आवडले नाही. तो एका उंच जागी उभा राहिला आणि सगळ्या लोकांना ती आनंदाची बातमी सांगू लागला. अवतार या दुसऱ्या प्रकारचे असतात, आणि सिद्ध पहिल्या प्रकारचे.”
सिद्ध म्हणजे पूर्णत्वाला पोचलेला माणूस: स्वतःच्या साधनेने देवाला पोचलेला. अवतार या शब्दाने श्रीरामकृष्णांना मानवी रूपात जन्मलेला देव म्हणायचे आहे; राम आणि कृष्ण असे अवतार होते, असे हिंदू मानतात. अवतार हा संस्कृत शब्द; त्याचा अर्थ ‘उतरणे’.