“चकमकीचा दगड कितीही वर्षे पाण्याखाली पडून राहिला, तरी त्याच्यातला अग्नी नाहीसा होत नाही. केव्हाही त्यावर लोखंड आपटा, की चमकती ठिणगी उडते. तसा खरा भक्त श्रद्धेत अढळ असतो. जगातल्या सगळ्या अशुद्धतेच्या गराड्यात तो राहत असला, तरी श्रद्धा आणि प्रेम कधीच गमावत नाही. देवाचे नाव कानी पडताच तो भावावेशात हरवून जातो.”