श्रीरामकृष्ण परमहंस · भक्ती, ज्ञान आणि कर्म
फीवर मिक्श्चर
“या युगासाठी सांगितलेला मार्ग म्हणजे भक्ती: प्रेम, भक्ती आणि शरणागती यांनी देवाशी जवळीक साधणे, नारद ऋषींनी साधली तशी. शास्त्रांनी माणसावर घातलेली सगळी कर्मे करायला आता वेळच नाही. दहा औषधी मुळांचा तो प्रसिद्ध काढा, दशमूळ, आजच्या तापांवर चालत नाही, हे तुम्हाला दिसत नाही का? औषधाचा गुण यायच्या आधीच रोगी दगावू शकतो. म्हणून आजकाल फीवर मिक्श्चरचा जमाना आहे.”
श्रीरामकृष्ण हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचे एक विद्वान प्रचारक पंडित शशधर यांच्याशी बोलत होते. शशधरांनी त्यांना सांगितले होते की ते स्वतः शास्त्रांतली सत्ये व्याख्यानांतून सांगतात. हे युग म्हणजे कलियुग; हिंदू मान्यतेप्रमाणे चार युगांपैकी शेवटचे आणि सर्वांत अंधारलेले युग. दशमुळाचा काढा हा जुना भारतीय उपाय; दहा मुळे सावकाश उकळून तो करतात. फीवर मिक्श्चरला इंग्रजी नावानेच ओळखत; ते दवाखान्यातले नवे औषध होते, आणि त्याचा गुण लवकर येई.